Raju Shetti Files Petition In HC On Lumpy : लम्पी रोगाविरोधात राजू शेट्टींची हायकोर्टात याचिका
राज्यातील पशुधनामध्ये वेगाने फैलावत असलेल्या लम्पी चर्मरोगाने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासह जवळपास 22 हून अधिक जिल्ह्यांमध्ये या रोगाने पाय पसरला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी तसेच अहमदनगरचे सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख, शेतकरी संपतराव पवार, सरपंच तेजस घुले पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी अॅड. असीम सरोदे, अॅड. तृणाल टोणपे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. अजिंक्य उडाणे, अॅड. अक्षय देसाई यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.