
Coronavirus | Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे विनामास्क मंत्रालयात दाखल | ABP Majha
Continues below advertisement
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शेकाप नेते जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मंत्रालयात दाखल झाले. परंतु यावेळी सर्व नेत्यांनी मास्क घातलेला असताना राज ठाकरे मात्र मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचले. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असताना राज ठाकरे यांनी मात्र मास्कशिवाय मंत्रालयात आल्याने चर्चा रंगली आहे.
Continues below advertisement