Raj Thackeray Meet Uddhav Thackeray: अखेर भाच्याच्या साखरपुड्यासाठी राज-उद्धव एकत्र

Raj Thackeray And Uddhav Thackeray: मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आलेच. निमित्त होतं, राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती आणि अभय देशपांडे यांच्या मुलाच्या साखरपुड्याचं. राज ठाकरेंचा भाचा यश देशपांडेच्या साखरपुड्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. या साखरपुडा समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. मुंबईतील दादर येथील एका सभागृहात हा साखरपुडा समारंभ पार पडला. याच कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसून आले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola