Ra Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Memorial: 11 वर्षांनी ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी

Continues below advertisement

Raj Thackeray-Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Memorial मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज 13 वा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने अगदी सकाळी सात वाजल्यापासून राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर (Balasaheb Thackeray Memorial) अभिवादन करण्यासाठी येत आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहकुटुंब बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले. यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. 

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, चंदू मामा, रश्मी ठाकरे एकत्र स्मृतीस्थळी थोडावेळ बसले. गेल्या अनेक महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेकवेळा एकत्र दिसले. तसेच दिवाळी, भाऊबीजसह अनेक कार्यक्रमात ठाकरे कुटुंबही एकत्र आले होते. परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 11 वर्षांनंतर दादरमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची काहीवेळ चर्चाही झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र बघता उपस्थित शिवसैनिक भावनिक झाल्याचंही दिसून आले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola