Raj Thackeray: मराठी पाट्यांच्या निर्णयाचं श्रेय मनसैनिकांचं- राज ठाकरे ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं बुधवारी घेतलाय. राज्य सरकारच्या आदेशात अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच ज्या दुकानात कामगार संख्या किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांना देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक लावणे बंधनकारक करण्यात आलंय. राज्य सरकारच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय. मात्र, व्यापारी संघटनानं राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय.
Continues below advertisement