Raj Thackeray on Thane Officer Attack : जेव्हा पोलिसांकडून सुटेल त्या दिवशी... : राज ठाकरे

Continues below advertisement

मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. तर कल्पिता पिंगळे यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे. हा भ्याड हल्ला एका अनधिकृत फेरीवाल्याने केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारे अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची हिंमत कशी होते, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या सोमवारी (30 ऑगस्ट) संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.  काल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याचे दिले असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram