Raj thackeray on MNS Workers : राज ठाकरे पुन्हा सक्रिय; मनसैनिकांना दिले 'हे' आदेश
शस्त्रक्रियेनंतर मनसे राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आलेत... मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिलेत.... सध्याच्या राजकारणाला लोक कंटाळलेत, त्यामुळे सदस्य नोंदणीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचा असे आदेशही राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत.... त्यानुसार २५ ऑगस्टपासून मनसेची राज्यभर सदस्य नोंदणी अभियान सुरु होणार आहे...