Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले, टोलनाके पेटवू; आक्रमक मनसैनिक मैदानात, विनाटोल गाड्या सोडल्या!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोलबाबत (Toll) घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मनसैनिक (MNS supporters) मैदानात उतरले आहेत. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असं राज ठाकरे यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी टोलनाक्यावरुन उतरून, लहान वाहने विनाटोल सोडले.