
Raj Thackeray Meet Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे 'वर्षा' बंगल्यावर
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत तसंच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभाच लोढा हे देखील उपस्थित होते. या भेटीचा फोटो देखील समोर आला आहे.
Continues below advertisement