Raj Thackeray BMC : राज ठाकरे अॅक्शन मोडवर! मुंबईतील 3 मोठ्या विषयांवर पालिका आयुक्तांची भेट
मी आयुक्तांच्या कानावर दोन विषय घातले. मुंबई शहरातील जमिनिखालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत, मग त्या रिलायन्स, अदाणीच्या असतील किंवा इतर ज्या काही आहेत..आज मुंबई महानगरपालिकेची एकूणच आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून येणारे जे पैसे आहेत, ते महानगरपालिका का घेत नाहीय? त्यांनी असं सांगितलं की ते आता राज्य सरकारने निर्णय केलेला आहे. परंतु, मला असं वाटतं की आता आयुक्तांकडून राज्य सरकारला त्या प्रकारचं पत्र जाईल आणि महानगरपालिकेला मिळणारे जे पैसे आहेत, ते हलवू नयेत. अशी आमची इच्छा आहे. एकतर जीएसटीमुळे ऑक्ट्रॉय बंद झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेवर खूप ताण आहे. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांवर इतर राज्यातून येणा-या पेशंटचा लोड खूप मोठा आहे... इतर राज्यांमधून येणा-या पेशंटसाठी काही वेगळे चार्ज लावता येईल का यावर चर्चा झाली तर मूर्तीकारांनी पिओपीच्या मूर्तींबाबत आता विचार करायला हवा, जर नियम माहित आहे; प्रदुषण होतंय हे माहितीय तर मूर्तीकारांनी विचार करायला हवा