Marathi signboard : मराठी पाट्यांचं श्रेय मनसैनिकांचंच; इतर कुणी श्रेय लाटू नका : Raj Thackeray

दुकानांवरील मराठी पाट्या लावताना शोधल्या जाणाऱ्या पळवाटा लक्षात घेता राज्य सरकारनं नियमात दुरुस्ती केली. आणि त्यानंतर महाराष्ट्रात दुकानांवरील मराठी पाट्यांचं श्रेय फक्त मनसेचं! असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भूमिका मांडलेय. महाराष्ट्रात मराठी पाट्यांसाठी मनसेनं आंदोलन केलं. मनसैनिकांनी अनेक केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षाही भोगल्या. त्यामुळे हे श्रेय इतर कुणीही लाटू नये.. ते फक्त मनसैनिकांचं आहे असं पत्रक राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलंय. दुकानांच्या पाट्यावर सर्वात मोठं नाव मराठीत असलं पाहिजे असा निर्णय राज्यमंत्रिमंडळानं घेतलाय. त्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं. तसंच दुकानांच्या फलकांवर मराठी भाषेशिवाय इतर कोणती भाषा नको असंही त्यांनी सुचवलंय. राज ठाकरे

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola