Shivaji Park Pollution Meeting : शिवाजी पार्कातल्या धुळीच्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी बैठक
सध्या शिवाजी पार्कात धुळीचं साम्राज्य पसरंलय.. याच पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथील धुळीच्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावतीने खुल्या बैठकिचे आयोजन करण्यात आलंय. या बैठकीला सर्व पक्षीय माजी लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी आणि शिवाजी पार्क परिसरातील नागरिक या बैठकिला उपस्थित राहणार आहेत. धुळीच्या प्रदूषणामुळे रहिवाशांना मोठा त्रास होत असून श्वसनाचे आजार सुद्धा जडत आहे.. यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलीय.
Tags :
Pollution MP Rahul Shewale Peoples Representative Shinde Group ShivajI Park Senior Officials Solution Empire Of Dust Organizing Meeting Harm To Residents Respiratory Diseases