Rahul Gandhi : 'त्या' प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा, अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित

Continues below advertisement

Gujarat News: मोदी आडनावावरून विनोद करणं राहुल गांधींना (Rahul Gandhi)  भोवलं  आहे.  2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना  दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सूरत कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मोदी आडनावावरून टीका केली होती.

राहुल गांधीनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरून  टीका केला होती. राहुल गांधीविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.  राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला. राहुल गांधीचा जामीन मंजूर झाला आहे.  मात्र या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली  वरच्या कोर्टात जाण्यासाठी कोर्टानं राहुल गांधींना 30  दिवसांचा वेळ दिला आहे.

2019 साली राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलारमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 'सर्व चोरांची आडनाव मोदीच कशी असतात', असं राहुल प्रचारसभेत म्हणाले होते. त्याविरोधात गुजरातमधील एका भाजप आमदारांनं पोलिसांत तक्रार केली होती.   राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. त्यावर आज सुरत सेशन्स कोर्टानं निकाल दिला आहे. राहुल गांधी कोर्टात म्हणाले, कोणाच्या भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही.;d/e

 

 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र या शिक्षेची अंमलबजावणी ३० दिवसांसाठी स्थगित करण्यात आली.. वरच्या कोर्टात जाण्यासाठी कोर्टानं राहुल गांधींना ३० दिवसांचा वेळ दिला आहे.. २०१९ साली राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलारमध्ये एक वादग्रस्त विधान केलं होतं.. सर्व चोरांचं आडनाव मोदीच कसं असतं, असं राहुल प्रचारसभेत म्हणाले होते.. त्याविरोधात गुजरातमधील एका भाजप आमदारानं पोलिसात तक्रार केली होती. त्यावर आज सूरत सेशन्स कोर्टानं निकाल दिला.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram