Malvani Rada : मालाडमधील मालवणी परिसरात रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान गोंधळ, परिस्थिती नियंत्रणात
मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत काहीसा गोंधळ उडाल्याची बातमी आहे. या शोभायात्रेदरम्यान दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या मालवणी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनबाहेर निदर्शनं केली. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.