Pune : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात एट्रॉसीटीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. मुरलीधर मोहोळ यांनी कोथरुडमधील त्यांच्या प्रभागातील सार्वजनिक शौचालय, ठेकेदार असलेल्या भाच्याच्या मदतीने तोडल्याचा आरोप आहे. कोथरुडच्या भीमनगर भागातील नागरिकांनी जागा सोडून जावी म्हणून महापौरांनी सार्वजनिक शौचालय तोडल्याचा आरोप करण्यात येतोय. देवीदास ओव्हाळ नावाच्या व्यक्तीने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिलेत.