Pune Ganpati Bappa : बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशमंडळं सज्ज, प्रशासनाची करडी नजर : ABP Majha

गेले दहा दिवस संपूर्ण राज्यभऱ एकच जयघोष होता.. तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया.. मात्र आज गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणण्याची वेळ आलीय.. कारण आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा आज गावाला परतणार आहे... अनंत चतुर्दशी म्हणजेच विसर्जनासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केलीय... मुंबईत गिरगाव, जुहू चौपाटी या प्रमुख विसर्जन स्थळांसह कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेत. तिकडे पुण्यातल्या मानाच्या गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात येणार आहे... तसंच नाशिक, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभर स्थानिक प्रशासनानं गणपती विसर्जनासाठी मोठी तयारी केली...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola