अनिल देशमुख मुंबईतच असल्याचा वकिलांचा दावा, ईडीकडून अद्याप समन्स मिळालं नसल्याची वकिलांची माहिती
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध ईडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा संपूर्ण तपशील माझाच्या हाती लागला आहे. ईडी कोर्टात अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध मोठा आरोप करण्यात आला आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे, अनिल देशमुख यांचे अटक झालेले स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी ईडीला कबुली दिली आहे की पोलीसांच्या बदल्यांमध्ये खास करुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हात होता.
Tags :
Anil Deshmukh CBI Parambir Singh CBI Raid ED Raid Anil Deshmukh Resign Anil Deshmukh Cbi Raid Cbi Anil Deshmukh Lawyer