Sputnik V : खासगी रुग्णालयांमध्ये 'स्पुटनिक-व्ही'चं लसीकरण, भारतात लशीचे 30 कोटी डोस तयार करणार
जुलै महिन्यापासून भारतात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यासंदर्भात घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली. मोठ्या प्रमाणात नागरिक असल्यामुळे लशींची कमतरता जाणवू लागली. सध्या भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यासोबतच स्पुटनिक व्ही आणि मॉडर्ना या लसींना देखील आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली असून लवकरच त्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होण्याची शक्यता आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन भारतात होणार असून खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवातदेखील झाली आहे.