Naigaon Police Vasahat: 'जबरदस्तीने लोकांना हटवलं तर आम्ही बुलडोजर पुढे उभे राहू' : प्रवीण दरेकर
नायगाव येथील पोलिस वसाहतीमध्ये धोकादायक इमारत असल्याचे सांगून येथील तीनशे घरांना नोटीस बजावण्यात आली आहे. पण ही घरं सोडण्यासाठी पोलिसांचे कुटुंबीय तयार नाहीत. आमचं पुनर्वसन या ठिकाणी करा, अशी यांची मागणी आहे. याच प्रश्नावर आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतली.