रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठाही लॉकडाऊनएवढाच महत्त्वाचा, सरकारने तिथेही लक्ष घालावं : प्रवीण दरेकर

Maharashtra Corona Lockdown : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. कारण आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. आज सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. 1 रुग्ण 25 जणांना बाधित करतो, त्यामुळे ही चैन तोडणं गरजेचं आहे. तरुण, लहान मुलं बाधित होत आहेत, त्यामुळं एकमुखानं निर्णयाची वेळ आली आहे. यात राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी केली आहे. आता  लॅाकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असं ते उद्धव ठाकरे म्हणाले.  सर्वांना एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज आहे, असं आवाहन देखील त्यांनी केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola