मुंबईबाहेरुन आल्याने प्रताप सरनाईक क्वॉरन्टाईन; चौकशी पुढच्या आठवड्यात करण्याची सरनाईकांची मागणी
मुंबई : आमदार प्रताप सरनाईक यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. मुंबई बाहेरून आल्यामुळे कोविड - 19 च्या नियमावलीनुसार ते क्वॉरंटाईन झाले आहेत. त्यांनी ED ला विनंती केली आहे की, विहंग सरनाईक यांच्या पत्नी हायपर टेन्शनमुळे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्या आहेत. त्यामुळे विहंग पत्नीसोबत ज्युपिटर हॉस्पिटलला आहेत. त्यामळे पुढच्या आठवड्यात विहंग आणि मला एकत्र चौकशीसाठी बोलवावे अशी विनंती ED च्या अधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज प्रताप सरनाईक यांचे मेहुणे विनंती पत्र घेऊन ED कार्यालयात जाणार आहेत. ED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंबीय संपूर्ण सहकार्य करणार, सरनाईक यांनी ED अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.