Prashant Kishore-Sharad Pawar Meet | प्रशांत किशोर आज शरद पवारांची भेट घेणार
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सध्या राजकीय भेटीगाठींचं केंद्र ठरत असलेलं सिल्वर ओक या शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी प्रशांत किशोर शरद पवारांना भेटणार आहेत. साधणतः या दोघांमध्ये दीड तास चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 11 वाजता ही भेट होणार आहे. पवार-किशोर यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर या भेटीमुळे राज्यासह देशाच्या राजकारणात काही बदल होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.