Prakash Ambedkar Tondi Pariksha : मोठा आरोप, राऊत-ठाकरेंची कोंडी! प्रकाश आंबेडकरांकडून गौप्यस्फोट

Continues below advertisement

Prakash Ambedkar Tondi Pariksha : मोठा आरोप, राऊत-ठाकरेंची कोंडी! प्रकाश आंबेडकरांकडून गौप्यस्फोट

मुंबई :  वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांनी एबीपी माझावर अतिशय मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi)  चर्चा सुरू असताना, पाच वर्षं भाजपसोबत (BJP)  न जाण्याचं आश्वासन देण्यास संजय राऊतांनी (Sanjay Raut) नकार दिला, आणि त्यामुळेच आमची चर्चा फिसकटली, असं आंबेडकर म्हणाले. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा (ABP Majha Tondi Pariksha) या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले,  पाच जागेंचा प्रस्ताव होता, असं आम्हाला माध्यमे सांगत होती. आम्हाला ज्या वेळी अटी टाकल्या त्यावेळी भाजपसोबत न जाण्याची अट ही पचणारी अट होती. त्यामुळे हा माणूस आणि हा पक्ष बाहेर गेलेला बरा त्यामुळे दोन जागेवर बसले होते. सांगणारा व्यक्ती संजय राऊत होता. त्यांनी स्वत: सांगितले आम्ही लेखी लिहून देऊ शकणार नाही, आम्ही आमचे दरवाजे बंद करणार नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram