Prakash Ambedkar on Ghatkopar Accident : उद्धव ठाकरेंनी होर्डिंग दुर्घटनेची जबाबदारी घ्यावी
Prakash Ambedkar on Ghatkopar Accident : वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी रमाबाई नगर घाटकोपर येथे काल झालेल्या होर्डिंग दुर्घटनेला भेट दिली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबियांच्या कुटुंबांशी संवेदना व्यक्त केली. तसेच या प्रकरणी दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजप- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने वर्षानुवर्षे बीएमसीला लुटले आहे आणि त्यात भ्रष्टाचार केला आहे. वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की, BMC च्या प्रत्येक अधिकाऱ्यावर शक्य तितक्या कठोर कारवाई करण्यात यावी ज्याने बेकायदेशीर होर्डिंगला इतके दिवस उभे राहू दिले त्यांना गजाआड करावे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबाला 20 लाख रुपये आणि 10 लाख रुपये मदत म्हणून तातडीने जाहीर करावी.अशी मागणी ही ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. यावेळी वंचित चे ईशान्य मुंबई लोकसभा उमेदवार दौलत खान, युवा नेते सुजात आंबेडकर उपस्थित होते.