Mumbai power outage : सायबर हल्ल्याचं गौडबंगाल, सायबर सेलचा अहवाल आज विधानसभेत

Continues below advertisement

मुंबई : गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अचानक विजपुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगलं होतं. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होतं. परंतु, मुंबईतील ब्लॅक आऊटसंदर्भात अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानंतर खळबळ माजली आहे. मुंबईतील ब्लॅकआऊटमागे चीनचा हात असल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. या संदर्भातील वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केलं आहे.


यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबईत पूर्ण दिवस विजपुरवठा खंडीत झालेल्या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे देण्यात आला होता. सायबर सेलकडून अहवाल गृहविभागाला सादर करण्यात आला आहे. हा अहवाल गृहविभाग ऊर्जा विभागाला सादर करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram