ठाण्यात मुसळधार पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता, संध्याकाळपासून पावसाचा जोर कायम
मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुबईला चांगलंच झोडपले. अशातच 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 4-5 दिवस कोकणात अती तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
Tags :
Konkan Maharashtra Rain Thane Rain Updates Mumbai Rain Thane Rain Raigad Monsoon Update Weather Update Monsoon Rain In Maharashtra