Maratha Kranti Morcha | शिवसेना भवनासमोर मराठा क्रांती मोर्चाने लावलेले फलक मुंबई पोलिसांनी हटवले

Continues below advertisement

शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय. दादर परिसरातील शिवसेना भवनाबाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फलकबाजी केली. यावेळी राज्य शासनानं शिवजयंतीच्या नियमावलीचं परिपत्रक काढल्यानंतर राज्यभरात झालेल्या गर्दीचे फोटो लावण्यात आले आणि सरकारला सवाल विचारण्यात आले. शिवाय, सरकार मराठा समाज आणि शिवजयंतीच्या विरोधात आहे का असा खोचक सवालही मराठा क्रांती मोर्चानं लावलाय. निर्बंधाविना शिवजयंती साजरी करण्याचा आग्रह मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram