PM Narendra Modi Speech Mumbai :गेल्या 10 वर्षात झालेलं काम ट्रेलर, पंतप्रधान मोदींकडून RBI चं कौतुक यांनी जनतेना संबोधित करताना म्हटलं, रिझर्व्ह बँक (RBI) च्या स्थापना दिनानिमित्त मी RBI च्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो. देशाला नवी दिशा दाखविण्याचे काम आरबीआयने केले आहे. देशाच्या विकासात आरबीआय महत्त्वाची आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, यूपीआयला चालना मिळाली. भारताची बँक व्यवस्था जगातील आघाडीची बँकीग व्यवस्था मानली जातेय. देशाच्या विकासासाठी भारतीय रिझर्व्ह बँक महत्त्वाची आहे, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. आरबीआयच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 90 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. गेल्या 10 वर्षात बँकींग क्षेत्रात मोठ्या सुधारणा यावेळी पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं की, एकेकाळी तोट्यातील अर्थव्यवस्था आज नफ्यात आहे. बँकीग व्यवस्थेतील स्थित्यांतर हा अभ्यासाचा विषय आहे. 2014 आधी बँकीग व्यवस्था डगमगली होती. गेल्या 10 वर्षात बँकींग क्षेत्रात मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. गेल्या 10 वर्षात झाले, तो फक्त ट्रेलर आहे. येत्या काळात आणखी बदल घडवायचे आहेत, असं मोदी म्हणाले.