PM Narendra Modi Shoot Mumbai Top View : पंतप्रधान मोदींनी शेअर केला मुंबईचा खास व्हिडिओ

Continues below advertisement

PM Narendra Modi Shoot Mumbai Top View : पंतप्रधान मोदींनी शेअर केला मुंबईचा खास व्हिडिओ

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. सीएसएमटी ते सोलापूर आणि  मुंबई ते शिर्डी दरम्यान या मार्गावर या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे, देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) समर्पित करताना मला खूप आनंद होत आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वे आणि मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी मोठा दिवस आहे, असे मोदी यावेळी मराठीतून बोलले. त्यानंतर त्यांनी आपले भाषण हिंदीतून केले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram