PM Narendra Modi Mumbai Metro ride:पंतप्रधान मोदींचा Gundavali ते Mogarapada दरम्यान मेट्रो प्रवास
PM Modi Mumbai Visit: डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज मुंबई दौऱ्यावर आले असून यावेळी बीकेसी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. ''आज मुंबईच्या विकासाशी संबंधित 40 हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं'', असं यावेळी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले आहेत. बीकेसी येथील सभेत पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) मराठीतून भाषणाची सुरुवात केली.