Pravin Darekar : प्रवीण दरेकर यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका ABP Majha
Continues below advertisement
मुंबै बँक प्रकरणी गुन्हा दाखल असलेले प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर तातडीनं सुनावणी व्हावी यासाठी दरेकरांच्या वकिलांचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबै बँकेत संचालक पदाच्या निवडणुकीत स्वतःला मजूर म्हणून दाखवणं हे प्रवीण दरेकरांना चांगलंच महागात पडलेलं आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं दरेकरांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयानं याचिका फेटाळून लावत त्यांना मुंंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार दरेकरांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. लवकरच या प्रकरणी सुनावणीची शक्यता आहेप्रवीण दरेकर
Continues below advertisement