Zebra Crossing : ... तर अपघाताला वाहन चालक जबाबदार ठरणार नाही , मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. पारवे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. तेव्हा, उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून महामार्गावरील फुटपाथ हा घटनास्थळापासून 35 फूट लांब तर रोडवरील दुभाजक 15 फूट अंतरावर असल्याचे आढळून आले. त्यावरून ही महिला घटनेदरम्यान रस्त्याच्या मधूनच रस्ता ओलांडत असल्याचे सिद्ध होत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील झेब्रा क्रॉसिंगच्या नियमांचा भंग करण्यात आला असून महामार्ग झेब्रा क्रॉसिंग असल्याशिवाय ओलांडू नये हे सर्वज्ञात आहे. तसेच अपघाताच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग होते याबाबत कोणताही अधिकृत पुरावा सादर करण्यात आलेला नाही. तसेच महिलेचा मृत्यू हा या अपघातामुळेच झाल्याे पुरावे पोलीस सादर करू शकले नाहीत. त्यामुळे आरोपीने सुसाट स्कूटर चालवल्यामुळे हा अपघात झाला असं जरी मान्य केलं तरीही त्याचा महिलेच्या मृत्यूशी थेट संबंध लावता येऊ शकत नाही, असे मत व्यक्त करत न्यायालयाने दुचारीस्वाराला या आरोपातून दोषमुक्त केलं.