Nalasopara | नालासोपारा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको; ट्रॅकवर उतरून गोंधळ
मुंबईतील नालासोपाऱ्या रेल्वे स्थानकावर संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला आहे. नालासोपारा एसटी स्टँड बंद केल्यामुळे प्रवाशी रेल्वे स्थानकावर आले आणि आम्हाला रेल्वेने प्रवास करू द्या अशी मागणी या संतप्त प्रवाशांनी केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर अनलॉकमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे.