Parambir Singh यांची कांदिवली गुन्हे शाखेकडून 7 तास चौकशी, पुन्हा चौकशीला बोलवण्याची शक्यता
Continues below advertisement
मुंबई : न्यायालयाने फरार घोषित केलेले परमबीर सिंह आज मुंबई पोलिसांपुढे हजर झाले आहेत. त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या आरोपांवर गुन्हे शाखेने त्यांची तब्बल सात तास चौकशी केली आहे. गुन्हे शाखेची ही चौकशी पूर्ण झाली असून परमबीर सिंहांनी त्यांच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी तपासाला सहकार्य करेन. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे आहेत. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि सत्याचा विजय होईल अशी एक्सक्लुझिव्ह माहिती परमबीर सिंहांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली. परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेने चौकशी केली असली तरी त्यांच्यावर इतरही काही आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्या प्रकरणांमध्येही परमबीरांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Parambir Singh