Mumbai : परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांच्या याचिकांवर हायकोर्टात आज सुनावणी

ज्येष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांनी त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्हे रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी आणि भ्रष्टाचाराचे गुन्हे आहेत, तर तर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणी सायबर सेलनं गुन्हा दाखल केला आहे. हायकोर्टानं याआधी दोघांनाही दिलासा दिला होता. मात्र त्याची मुदत आज संपत असल्यानं आजची सुनावणी महत्वाची ठरणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola