Parab Bir Singh : परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यासाठीच्या याचिकेवर आज निर्णय ABP Majha

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यासाठीच्या याचिकेवर आज निर्णय येणं अपेक्षित आहे. ५ वेगवेगळ्या खंडणी प्रकरणी आरोपी असलेले परमबीर यांना फरार घोषित करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अर्ज केला. त्यावर आज निकाल येण्याची शक्यता आहे. परमबीर यांच्या व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींनाही फरार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे. न्यायालयानं या तिन्ही आरोपींविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर ते बजावण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींना त्यांच्या पत्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे आढळले नाहीत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola