Mumbaiच्या परळमधील हॉटेलात किरीट सोमय्यांची surprise visit, पुण्यातल्या COVID Center वरून आरोप
संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत परळमधल्या हॉटेलमध्ये सरप्राईज व्हिजिट दिली. पुण्यातलं कंत्राट मुंबईतल्या एका चहावाल्याला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. आज सकाळी सोमय्या परळमधील या चहावालाच्या सह्याद्री हॉटेलमध्ये पोहोचले. आणि हॉटेलमालकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला