Lockdown | पनवेलमध्ये लॉकडाऊन असूनही बर्थ डे पार्टी करणाऱ्या भाजप नगरसेवकावर गुन्हा

Continues below advertisement
एकीकडे सरकार, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील असताना, लोकप्रतिनिधींनीच नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचं चित्र आहे. लॉकडाऊन सुरु असताना बर्थडे पार्टी करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन आणि जमावबंदी असताना देखील मित्रांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणारा पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरा यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. नगरसेवकसह त्याच्या 11 साथीदारांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram