Pankaja Munde Reaction Dhananjay Munde : आता बातमी बहिणभावाच्या नात्याची. राजकीय पटलावर एकमेकांवर टीकेचे आसूड ओढणारे पंकजा आणि धनंजय मुंडे हे सख्खे चुलत बहीणभाऊ संकटकाळात मात्र कायम एकमेकांसोबत कायम असतात. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला. परळीतल्या कार अपघातात दुखापतग्रस्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना उपचारांसाठी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस केली.