Palghar Shinde Supporters : पालघरमधील आमदार, खासदार यांच्यापाठोपाठ अनेक पदाधिकारीही शिंदेंबरोबर
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पालघर जिल्ह्यात शिवसेनेत मोठी फूट पडलीय. शिवसेनेचे खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी शिंदे गटाची वाट धरलीय. वसईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी भेट घेतली. वसईचे उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, तालुकाप्रमुख निलेश तेंडुलकर, दिवाकर सिंग, सुदेश चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी काल मुंबईत शिंदे यांची भेट घेतली. याशिवाय खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा,जिल्हाप्रमुख राजेश शहा, जिल्हा परिषद गटनेते प्रकाश निकम यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.