Palghar : आधी गुन्हा, नंतर निर्दोष म्हणून सोडलं ; पोलिस म्हणतात... ABP Majha
Continues below advertisement
राज्यात सध्या दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच पालघर मधील बोईसर येथे एका पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली होती. 12 सप्टेंबरला ही घटना बोईसर मधील एका परिसरामध्ये समोर आली होती आणि 14 सप्टेंबरला बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांचा संशय बळावला मुळे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली आणि या मध्ये बोईसर पोलिसांना खऱ्या नाराधमला पकडण्यात यश आलं असून चैतुशिंग ठाकूर वय 25 अस या नराधमाच नाव असल्याचे समोर आलं असून, या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर बॉइसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांनतर एका अल्पवयीन 12 वर्ष्याच्या मुलाला अटक करून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. 25 वर्षीय आरोपीला पकडल्यानंतर या बारा वर्षीय निरपराध चिमुकल्याला सोडून देण्यात आला आहे तर पीडित चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली होती.
Continues below advertisement