Palghar जिल्हा मुख्यालय लोकार्पण सोहळा ऑनलाईन होणार, मंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्ते नाराज

पालघर जिल्हा मुख्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा दौरा रद्द झाला असून आता हा सोहळा ऑनलाईन पार पडणार आहे. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अतिउत्साही कार्यकर्त्यांनी बोईसर, बेटगाव, आणि पालघरमध्ये हजारो बॅनर लावले होते. मात्र दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांची निराशा झालीय. एकीकडे मुख्यमंत्र्यांकडून बॅनरबाजी न करण्याचं आवाहन करण्यात येतंय. तर तिकडे काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून शहर विद्रुप करण्यात येत असल्याचं पाहायला मिळालं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola