Oxygen Shortage : मुंबईत ऑक्सिजन पुरवठा उद्यापर्यंत सुरळीत : किशोरी पेडणेकर
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या संपूर्ण देशात वाढली असून त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच मुंबईतील ऑक्सिजनचा जो तुटवडा झाला आहे तो उद्यापर्यंत सुरळीत होईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
Tags :
Corona Maharashtra Mumbai Oxygen Shortage BMC Mayor Kishori Pednekar Oxygen Cylinder Oxygen Cylinder Shortage