Uday Samant | अंतिम वर्षांची परीक्षा देता न आलेल्यांना 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा संधी : उदय सामंत
राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु आहेत. मात्र, पूरपरिस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणी अनेक विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांची परीक्षा देता आली नाही. अशा विद्यांर्थ्यांची 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा घेणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. सोबत सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. शुक्रवारी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या बैठकी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परीषदेत दिली.