Corona Vaccine | मुंबईत 3-4 दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा : महापौर किशोरी पेडणेकर
Continues below advertisement
मुंबई : मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा आहे. शहरात सध्या फक्त 1 लाख 85 हजार कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसंच केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिकचा लस पुरवठा करावा. लसीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस देण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही महापौरांनी व्यक्त केली.
कोरोना लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु जर त्यांना केंद्रावर येऊन लस न घेता परतावं लागत असेल तर त्यांना पुन्हा लसीकरणासाठी आणणं जिकीरीचं होईल, असंही पेडणेकर म्हणाल्या.
Continues below advertisement
Tags :
Corona Vaccination Corona Vaccine Vaccine Mumbai Mayor Kishori Pednekar Shortage Of Corona Vaccine