
कागदपत्रे गोळा करुन परस्पर कर्ज, हफ्त्यासाठी बँकेकडून तगादा सुरु झाल्याने फसवणूक उघडकीस
Continues below advertisement
ऑनलाईन बँक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असल्याचं सध्या समोर येत आहे. अशाच प्रकारची एक घटना नवी मुंबईत समोर आली आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीने कर्जाचं आमिष दाखवून गोरगरीबांची कागदपत्रं गोळा केली. त्यानंतर नियमात बसत नाही असं सांगून त्या लोकांच्या नावे परस्पर आरबीएल बँकेतून कर्ज उचललं. बँकेतून हप्त्यासाठी तगादा सुरु झाल्यानंतर फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं.
Continues below advertisement