Mumbai Rail Andolan: 'एक प्रवाश्याचा मृत्यू, तीन जखमी', रेल्वे कर्मचारी आंदोलनामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
Continues below advertisement
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) रेल्वे कर्मचारी संघटनेने संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी आंदोलन केल्याने मोठा गोंधळ उडाला. या आंदोलनामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली, ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. प्राप्त माहितीनुसार, 'या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत आणि एका प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे'. आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेक प्रवासी रेल्वे रुळावरून चालत जवळचे स्टेशन गाठण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान, मस्जिद बंदर आणि सँडहर्स्ट रोड स्टेशनच्या मध्ये अंबरनाथ लोकलने काही प्रवाशांना धडक दिली, ज्यात हे प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा सुमारे एक तास विस्कळीत झाली होती, ज्यामुळे सर्व स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement