Attack on Ambedkar's house | राजगृहाची तोडफोड करणारा सापडला, 15 दिवसानंतर मुख्य आरोपीला अटक
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर 7 जुलै रोजी दोघांनी नासधूस केली होती. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या होत्या तसंच घरातील कुंड्यांचीही नासधूस केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 15 दिवसानंतर तोडफोड करणाऱ्याला अटक केली आहे. विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काल्या याला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून त्याला बुधवारी अटक करण्यात आली. राजगृहाबाहेरील परिसरात मोफत जेवण मिळत असल्याने मोरे तिथल्या समोरच्या पदपथावर राहायचा. मात्र घटनेच्या आदल्या दिवशी त्याला हटकले, त्या रागातून त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.