Mumbai Local Mega Block :1 जानेवारीला मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार
नवीन वर्षाची सुरुवात जंगी सेलिब्रेशनने करण्याचा आणि त्यासाठी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर मुंबईकरांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या सकाळी ११ ते दुपारी पावणे ४ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटीवरुन सकाळी सव्वा १० ते सव्वा ३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा या जलद मार्गावर वळवण्यात येतील. दरम्यान, पश्चिम मार्गावरील प्रवाशांची ब्लॉकमधून सुटका झालीये... लोकलच्या सर्व सेवा सुरळीत सुरू राहतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेने पत्रकाद्वारे दिली आहे.