महाराष्ट्रात Omicron Variant ची पहिली केस, काय काळजी घ्यावी? सांगतायत टास्क फोर्स सदस्य डॉ. राहुल पंडित

Continues below advertisement

Maharashtra Omicron Case: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटची महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. डोंबिवलीमध्ये दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. देशातील  चौथा ओमायक्रॉनचा रुग्ण आहे. याआधी कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram